Jasprit Bumrah return West Indies Test series 2025
esakal
जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहेत.
भारताचा १५ सदस्यीय संघ या मालिकेसाठी आज जाहीर केला जाणार आहे.
रिषभ पंत दुखापतीमुळे विंडीज मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
Team India squad updates West Indies tour : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळत असल्याने जसप्रीत २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीला मुकण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ आज जाहीर होणार आहे.