
ICC ODI Cricketers Of the Year: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०२४ वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येत असून पुरस्कार विजेत्यांची नावंही घोषित केली जात आहेत.
आयसीसीने सोमवारी (२७ जानेवीरी) वनडेतील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. यादरम्यान, भारतासाठीही आनंदाची बातमी मिळाली आहे.
भारताची स्टार क्रिकेटपटू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू २०२४ पुरस्कार मिळाला आहे. तिने हा पुरस्कार मिळवताना दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.