

Jasprit Bumrah
Sakal
Jasprit Bumrah Set to Play against Netherlands: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पहिली फेरी आता अखेरच्या टप्प्यात आहे. पहिल्या फेरीतील भारताचा शेवटचा सामना बुधवारी (१८ फेब्रुवारी) नेदरलँड्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारताने यापूर्वीच सुपर-८मध्ये (Super-8) प्रवेश केला आहे. त्यामुळे या सामन्याचा फारसा परिणाम स्पर्धेवर दिसणार नाही. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला (Team India) प्रयोग करण्याची संधी आहे.
याशिवाय भारताचा सुपर-८ मधील पहिला सामनाही अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे त्या सामन्याच्या तयारीच्या दृष्टीनेही भारतासाठी नेदरलँड्सचा सामना महत्त्वाचा असेल.