
India vs Australia 4th Test: भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने या सामन्यातून पदार्पण करताना सलामीला ६५ चेंडूत ६० धावांची वादळी खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान भारताचा चालू मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहवर हल्लाबोल केला होता.
त्याने बुमराहविरुद्ध दोनच षटकात ३२ धावा चोपल्या होत्या. २०२१ नंतर बुमराहला पहिल्यांदाच कसोटीत षटकार मारला. त्याबाबत आता बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे. बुमराहने तो कुतूहल वाढवणारा फलंदाज आहे. तसेच त्यानं असंही म्हटलं की तो त्याला ६-७ वेळा बाद करू शकला असता.