
Australia vs India Boxing Day Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत जसप्रीत बुमराहने मोठे विक्रम केले आहेत. कसोटी मालिकेतील हा चौथा सामना आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के दिले. त्याने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेताच इतिहासही रचला.
या सामन्यात भारताचा पहिला डाव चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ३६९ धावांवर संपला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. मात्र दुसऱ्या डावात बुमराहने सॅम कॉन्स्टासला ८ धावांवर त्रिफळाचीत केले.