
Australia vs India Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डीने त्याच्या फलंदाजीने गाजवला. त्याने शानदार शतकी खेळी केली आणि भारताची लाज राखली. या सामन्यात त्याने केलेल्या सेलिब्रेशनचीही बरीच चर्चा झाली.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात १९१ धावांत ६ विकेट्स गमावल्या असताना आठव्या षटकात नितीश रेड्डी फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी भारतीय संघावर फॉलोऑनचे संकट होते. पण नितीशने आठव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी करत फॉलोऑनचे संकट तर टाळलेच, पण भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंतही पोहचवले.