

Jasprit Bumrah replacement for Sri lanka test tour
esakal
Jasprit Bumrah ruled out Sri Lanka tour: भारताचा श्रीलंका दौरा १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती.
त्यावेळी जसप्रीत बुमराहचं नाव संघात पाहून चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. मात्र आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे जसप्रीत बुमराहला श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडावं लागलं आहे.