Ravi Shastri's advice for Jasprit Bumrah ahead of World Cup 2027
Ravi Shastri advises Jasprit Bumrah on workload management: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला किवीविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारत पाच वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि या दोन्ही मालिकांमध्ये जसप्रीतची अनुपस्थिती जाणवेल. पुढील वर्षी होणारा वन डे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लक्षात घेता, व्यवस्थापनाने जसप्रीतच्या कामाचा ताण सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.