

Jasprit Bumrah Training With Son
Sakal
Bumrah's Son Angad Mimics Bowling Action: भारतीय क्रिकेट संघाला फेब्रुवारी-मार्चदरम्यान टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळायची आहे. त्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघात २१ ते ३१ जानेवारी दरम्यान पाच टी२० सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धांमधील सामन्यांमध्ये भारतासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज असेल.
तथापि, या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी सध्या बुमराह जोरदार ट्रेनिंग करत आहे. त्याला एका क्युट पार्टनरची साथ मिळाली असून त्याचा व्हिडिओ (Video) बुमराहने सोशल मीडियावर शेअर केला आहे.