
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बहुप्रतीक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईला रविवारी खेळला जात आहे. या सामन्यासाठी अनेक सेलिब्रेटिंनी दुबईला हजेरी लावली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुबईला पोहोचला आहे.
या सामन्याआधी त्याचा त्याने जिंकलेल्या आयसीसी २०२४ पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही मुकला आहे.