
India Squad for ODI Series against England: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळायची आहे. त्यामुळे अखेर शनिवारी (१८ जानेवारी) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.
काही खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे, तर काही खेळाडूंचा चर्चेनंतरही फार विचार करण्यात आलेला नाही. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.