
जसप्रीत बुमराह सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो मैदानात तर फलंदाजांची भंबेरी उडवत आहेच, पण मैदानाबाहेरही फटकेबाजी करताना दिसतो. सध्या भारत आणि इंग्लंड संघात लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.
या सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात बुमराहने ५ विकेट्स घेत दमदार कामगिरी केली. त्यानंतर तो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याचा मिश्किल स्वभावही सर्वांसमोर आला.