Scotland are on standby to replace Bangladesh in the T20 World Cup
esakal
Jay Shah tough stance on Bangladesh cricket issue: बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ( BCB) समजावण्याचे सर्व प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) करून पाहिले, परंतु बांगालदेश सरकार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. बांगलादेश बोर्डाने T20 World Cup स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला आहे आणि ते मागे हटण्याचं नाव घेत नाहीए. भारतात त्यांच्या खेळाडूंना कोणत्याही सुरक्षिततेचा धोका नसल्याचे आयसीसीने समजावून सांगितले, तरीही BCB त्यांचा हट्ट सोडत नाही. त्यामुळे आता आयसीसीने त्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे आणि त्यांनी भूमिका न बदलल्यास त्यांच्याशिवाय वर्ल्ड कप खेळण्याची तयारी आयसीसीने सुरू केली आहे.