दक्षिण आफ्रिकेने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनमध्ये ऑस्ट्रेलियाला चार दिवसांत पराभूत केले. आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि आता कसोटी फॉरमॅटमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( ICC) प्रमुख जय शाह यांनी आता कसोटी क्रिकेट पाचऐवजी चार दिवसांची करण्याचे संकेत दिले आहेत. आफ्रिकेच्या संघाला WTC Final जेतेपेदाची ट्रॉफी दिल्यानंतर शाह यांनी हे संकेत दिले आहेत. पण, या नव्या फॉरमॅटमधून तीन संघांना सूट दिली गेली आहे.