जय शाह यांच्यावर प्रसिद्ध क्रिकेट लेखकाने केली टीका
जय शाह हे सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत
जय शाह यांच्या कार्यक्षमतेवर टीका
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. बीसीसीआयने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९,७४१.७ कोटी रुपये महसूल मिळवला आणि या कमावलेल्या एकूण महसुलापैकी ५९ टक्के वाटा एकट्या आयपीएलचा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व पाहायला मिळतेय. भारतीय क्रिकेटच्या प्रगतीचे श्रेय जय शाह ( Jay Shah) यांना दिले जात आहे. पण, प्रसिद्ध क्रिकेट लेखक गिडियन हेग ( Gideon Haigh ) यांनी जय शाह यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.