फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

JEET RAVAL RETIREMENT: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जीत रावलने १८ वर्षांच्या कारकिर्दीनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने २४ कसोटी सामने खेळले असून, शालेय क्रिकेटमध्ये तो पार्थिव पटेलसोबत सलामीला फलंदाजी करायचा.
JEET RAVAL

JEET RAVAL RETIREMENT

esakal

Updated on: 

JEET RAVAL RETIREMENT: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जीत रावल याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तस तर तो गुजरातमध्ये जन्मलेला होता मात्र त्याने न्यूझीलंडकडून २०१६ ते २०२० या काळात २४ कसोटी सामने खेळले होते.

विशेष म्हणजे, जीत रावल आणि भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल यांनी शालेय क्रिकेटमध्ये एकत्र सलामीला फलंदाजी देखील केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com