Ishan Kishan Century: १५ चौकार, ६ षटकार! कर्णधार इशान किशनचे थोडक्यात हुकले द्विशतक, टीकाकारांना दिले उत्तर...

Ishan Kishan scores 173 runs with 15 fours and 6 sixes: झारखंडचा कर्णधार इशान किशनने रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये तुफानी खेळी करून पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. तामिळनाडूविरुद्ध खेळताना त्याने २४७ चेंडूत १७३ धावांची भव्य खेळी साकारली.
Ishan Kishan celebrates his stunning 173-run knock with 15 fours and 6 sixes in Ranji Trophy 2025-26 against Tamil Nadu

Ishan Kishan celebrates his stunning 173-run knock with 15 fours and 6 sixes in Ranji Trophy 2025-26 against Tamil Nadu

esakal

Updated on

Ishan Kishan Jharkhand captain innings vs Tamil Nadu Ranji Trophy 2025 : दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या इशान किशनने रणजी करंडक स्पर्धा २०२५-२६ च्या पहिल्याच सामन्यात वादळी शतक झळकावले. झारखंड संघाचे नेतृत्व करताना इशानने तामिळनाडूच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १५ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडला, परंतु त्याला द्विशतकापासून थोडक्यात वंचित रहावे लागले. इशानने ही खेळी करून टीम इंडियात पुनरागमनासाठी जोर लावला आहे आणि टीकाकारांनाही उत्तर दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com