Jasprit Bumrah: बुमराह फिट असल्याचं सांगितलं, मग अचानक OUT का? CoE आणि आगरकरांच्या समितीत नेमकं काय बिनसलं?

Jasprit Bumrah fitness controversy: बुमराह फिट असल्याचं सांगितल्यानंतर अचानक श्रीलंका मालिकेतून OUT का झाला? CoE आणि अजित आगरकरांच्या निवड समितीतील समन्वयावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
Jasprit Bumrah fitness

Jasprit Bumrah

esakal

Updated on

Jasprit Bumrah fitness controversy: भारतीय संघ १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहचं(Jasprit Bumrah ) पुनरागमन होणार, अशी बातमी आल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. संघ जाहीर करतानाच बीसीसीआयने बुमराहची निवड त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचं सांगितलं होतं.

मात्र काही दिवसांतच चित्र बदललं. बुमराह अजून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलं. त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबी याला भारतीय कसोटी संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com