

Joanne Hicks
esakal
Joanne Hicks Record: क्रिकेटमध्ये वयाला काहीच मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयल ऑफ मॅनच्या ५१ वर्षीय जोएन हिक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कोणालाही करता आलेली नव्हती. ग्रीसविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हिक्स यांनी पाच विकेट घेतल्या आणि मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
हिक्स यांनी ही कामगिरी ५१ वर्षे आणि १७१ दिवसांच्या वयात केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर पाच विकेट घेणाऱ्या त्या पहिल्याच खेळाडू ठरल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या विक्रमामुळे तब्बल ९४ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.