Joe Root Record: सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम जो रूटने मोडला! ५२१ डावांत मोठा पल्ला गाठला... द्रविडचा विक्रम मोडण्याचा निर्धार

JOE ROOT OVERTAKES SACHIN TENDULKAR: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Joe Root | ENG vs SL ODI

Joe Root surpasses Sachin Tendulkar 23000 international runs

esakal

Updated on

Joe Root breaks Sachin Tendulkar record in international cricket: जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आणखी एका विक्रम मोडला. इंग्लंडच्या स्टार फलंदाजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात ४४ धावांची खेळी करून या पराक्रमाला गवसणी घातली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा करणारा दुसरा वेगवान फलंदाज ठरला. रूटने ५२१ डावांत हा टप्पा गाठताना तेंडुलकरला ( ५२२) मागे सोडले. या विक्रमात अव्वल स्थानावर विराट कोहली ( ४९० डाव) विराजमान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com