

Joe Root Test Cricket
Sakal
ऍशेस २०२५-२६ स्पर्धेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानात खेळवला जात आहे. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू झाला असून पहिल्याच दिवशी जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी दमदार फलंदाजी केली आहे.
पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने ४५ षटकांचाच खेळ होऊ शकला. पण तरी पहिला दिवस जो रुट (Joe Root) आणि हॅरी ब्रुक या इंग्लंडच्या खेळाडूंनी नाबाद अर्धशतक करताना गाजवला आहे. यादरम्यान जो रुटसाठी हे अर्धशतक विक्रमी ठरले आहे.