Kagiso Rabada ने मोडला फलंदाजीतील ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम, शाहीन आफ्रिदीला भारताच्या अभिषेक शर्मासारखे झोडले Video Viral

Kagiso Rabada breaks 119-year-old record : दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेच्या नं. ११ फलंदाजाच्या रूपात रबाडाने ११९ वर्षांचा जुना विक्रम मोडला.
South Africa’s No. 11 Rabada Smashes 119-Year-Old Test Batting Record

South Africa’s No. 11 Rabada Smashes 119-Year-Old Test Batting Record

esakal

Updated on

Kagiso Rabada Smashes 119-Year-Old Test Batting Record : कागिसो रबाडाने त्याचं नाव फलंदाजांच्या विक्रमांमध्ये सुवर्णाक्षराने नोंदवले. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रबाडाने फलंदाजीत कमाल दाखवली. त्याने सेनुरन मुथूसामीसह दहाव्या विकेटसाठी ११७ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने ८ बाद २३५ धावांवरून पहिल्या डावात ४०४ धावांपर्यंत मजल मारली. रबाडाने ११व्या क्रमांकावर फलंदाजीला येताना ६१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ७१ धावा केल्या. त्याने पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला उभ्या उभ्या षटकार हाणला आणि तो पाहून सर्वांना टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आठवला. पण, रबाडाने ७१ धावांच्या खेळीसह ११९ वर्षांपू्र्वीचा मोठा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com