
Vinod Kambli News : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सध्या प्रकृती फारशी बरी नसते. काही दिवसांपूर्वीच क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण कार्यक्रमात कांबळी दिसला होता. त्यावेळी त्याची प्रकृती पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.
या कार्यक्रमानंतर काही दिवस उलटले असतानाच त्याला डिसेंबर २०२४ च्या अखेरीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुंबईतील भिवंडी येथील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तिथे उपचार सुरू होते.