
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी सध्या त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. धोनीचा आयपीएल २०२५ मध्ये फलंदाजीत आक्रमक अंदाज पाहायला मिळाला आहे. तसेच ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघातून बाहेर झाल्याने तो आता चेन्नईचे पुन्हा नेतृत्वही करतोय.
पण याचदरम्यान आता धोनीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून तो लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसत असून करण जोहरने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.