
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी (१४ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केलं. चेन्नईचा हा ७ सामन्यांमधील दुसराच विजय आहे. चेन्नईला या हंगामात पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सलग ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यातच ५ सामन्यांनंतर त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा एमएस धोनीच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली.