
Vijay Hazare Trophy 2025 Karun Nair's impressive performance:
"Dear cricket, give me one more chance," करुण नायरने डिसेंबर २०२२ मध्ये ही पोस्ट केली होती, कारण त्याला त्याची कारकीर्द संपल्यात जमा झाल्याचे वाटले होते. पण, मधल्या फळीतील या फलंदाजाने मागील वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा धुमाकूळ घातलाय, की निवड समिती त्याला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देण्याचा विचार करत आहे.