Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Kevin Pietersen Ends 12 Year Exile to Join England Team: केविन पीटरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा २०१४मध्ये कडू शेवट झाला होता. पण यानंतर आता १२ वर्षांनी तो पुन्हा इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार आहे. याबाबत इंग्लंडने घोषणा केली आहे.
Kevin Pietersen Appointed England Specialist Mentor

Kevin Pietersen Appointed England Specialist Mentor

Sakal

Updated on

Kevin Pietersen Return in England White Ball Setup: पुढच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची तयारी संघांची सुरू झाली असून अशातच इंग्लंडने मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसनला संघात दाखल करून घेतले आहे.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीचा २०१४ मध्ये इंग्लंड बोर्डाशी झालेल्या वादातून कडू शेवट झाल्यानंतर १२ वर्षांहून अधिक काळानंतर पीटरसन पुन्हा इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार आहे. त्याला वनडे आणि टी२० प्रकारासाठी इंग्लंडने विशेष मार्गदर्शक (specialist mentor) म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे तो आता इंग्लंडचा वनडे आणि टी२० संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबत काम करेल.

Kevin Pietersen Appointed England Specialist Mentor
England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com