कायरन पोलार्डने त्रिनबॅगो नाईट रायडर्ससाठी सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्सविरुद्ध ८ चेंडूत ७ षटकार मारले. पोलार्डने कर्णधार निकोलस पूरनच्या साथीने ९० धावांची भागीदारी केली. त्रिनबॅगोने १२ धावांनी सामना जिंकला. .कायरन पोलार्ड हा आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्याने आजपर्यंत अनेकदा वादळी खेळी केल्या आहेत. एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रमही यापूर्वी त्याने केलेला आहे. आता तर ३८ वर्षीय पोलार्डने चक्क ८ चेंडूत ७ षटकार मारले. सोमवारी (१ सप्टेंबर) त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघात सामना झाला. हा सामना त्रिनबॅगोने १२ धावांनी जिंकला. पोलार्डचा याच मोठा वाटा राहिला..Babar Azam : पाकिस्तानचा 'किंग' प्रदर्शनीय सामन्यातही क्लिनबोल्ड, नेटिझन्सनी घेतली मजा; Video viral.या सामन्यात त्रिनबॅगोने प्रथम फलंदाजी करताना ७८ धावांमध्ये ३ विकेट्स गमाव्या होत्या. त्यानंतर पोलार्ड फलंदाजीला आला. त्याला कर्णधार निकोलस पूरनचीही चांगली साथ मिळाली. पोलार्डने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिर होण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्याने १३ चेंडूत १२ धावाच केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याने गिअर बदलले. त्याने १५ आणि १६ षटकादरम्यान सामना केलेल्या ८ चेंडूत ७ षटकार मारले. त्याने १५ व्या षटकात नॅवियन बैडैसीविरुद्ध तीन षटकार मारले, तर १६ व्या षटकात वकार सलामखैलविरुद्ध ४ षटकार मारले. त्यामुळे त्याने २१ चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. .दरम्यान, ९० धावांची पूरनसोबत भागीदारी केल्यानंतर पोलार्ड १९ व्या षटकात काईल मेयर्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पोलार्डने २९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याने २ चौकार आणि ८ षटकार मारले. पूरननेही अर्धशतक केले. पण तो शेवटच्या षटकात ३८ चेंडूत ५२ धावांवर बाद झाला. आंद्रे रसेल ५ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. त्रिनबॅगोने २० षटकात ६ बाद १७९ धावा केल्या. त्रिनबॅगोकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या..KCL 2025: १२ चेंडूत ११ षटकार! T20 सामन्यात केरळच्या फलंदाजाचा पराक्रम, पाहा Video.त्यानंतर १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्सला २० षटकात ६ बाद १६७ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून सलामीवीर आंद्रे फ्लेचरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली, तर एविन लेविसने ४२ धावा केल्या. बाकी खेळाडूंना मात्र खास काही करता आले नाही. त्रिनबॅगोकडून गोलंदाजी करताना नॅथन एडवर्ड्सने ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद अमीरने २ विकेट्स घेतल्या, तर उस्मान तारिकने १ विकेट घेतली..FAQs१. पोलार्डने या सामन्यात किती धावा केल्या?(How many runs did Pollard score in this match?)➤ पोलार्डने २९ चेंडूत ६५ धावा केल्या.२. पोलार्डने किती षटकार मारले?(How many sixes did Pollard hit?)➤ त्याने ८ षटकार मारले.३. निकोलस पूरनने किती धावा केल्या?(How many runs did Nicholas Pooran score?)➤ पूरनने ३८ चेंडूत ५२ धावा केल्या.४. त्रिनबॅगो नाईट रायडर्सने किती धावांनी विजय मिळवला?(By how many runs did Trinbago Knight Riders win?)➤ त्रिनबॅगोने हा सामना १२ धावांनी जिंकला.५. सेंट किट्सकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?(Who scored the most runs for St Kitts?)➤ आंद्रे फ्लेचरने ६७ धावा केल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.