IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

KKR playoff qualification scenario after PBKS win: कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर IPL 2026 प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत कठीण समीकरण उभे राहिले आहे. पंजाब किंग्सने शनिवारी लखनौ सुपर जायट्सवर विजय मिळवल्यानंतर KKR च्या आशा जवळपास नेट रनरेटवर अवलंबून राहिल्या आहेत.
How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs

How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs

esakal

Updated on

How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs? श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने अत्यंत कुशलतेने लक्ष्याचा पाठलाग केला. जिंकणे अनिवार्य असलेल्या या सामन्यात, पंजाबने १८ षटकांत १९७ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले. या विजयानंतर पंजाबने १४ सामन्यांत १५ गुण व ०.३०९ असा नेट रन रेट राखून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे आता कोलकाता नाइट रायडर्सचे गणित बिघडले आहे. त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी PBKS ला नेट रन रेटमध्ये मागे टाकणे गरजेचे आहे आणि ही गोष्ट सोपी नक्कीच नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com