

KKR Playoff Qualification Scenario
esakal
How can KKR qualify for playoffs after 0 wins in 4 matches: कोलकाता नाइट रायडर्स संघाला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर पराभूत केले. अजिंक्य रहाणेच्या संघाचा हा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला आहे, पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागलेला आणि त्यामुळे त्यांना एक गुण मिळाला. पण, कालच्या पराभवाने KKR चे प्ले ऑफमधील आव्हान आणखी खडतर केले आहे. कोलकाताने चारपैकी तीन सामने घरच्या मैदानावर खेळले आणि त्यात दोनमध्ये त्यांची हार झालीय, एक सामना पावसामुळे रद्द झालाय. ही खरी त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे..