Hardik Pandya reply to Ravi Shastri goes viral
esakal
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Marathi Cricket News: प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सला आता केवळ विजयाची नव्हे, तर इतर संघाच्या मदतीची गरज आहे. १२ सामन्यांत ११ गुणांसह हा संघ अजूनही शर्यतीत आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून तो १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव, हे परतले आहेत. KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेचा हा निर्णय कॅमेरून ग्रीनने ( Cameron Green) योग्य ठरवला आणि एकाच षटकात दोन धक्के दिले. त्यानंतर सौरभ दुबेने चौथ्या षटकात रोहित शर्माची विकेट मिळवून मुंबईला बॅकफूटवर फेकले.