Varun Chakaravarthy angry after collision with Angkrish Raghuvanshi
esakal
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Marathi Cricket News: मुंबई इंडियन्सला इडन गार्डनवर साजेशी कामगिरी करता आली नाही. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना MI ला कमी धावसंख्येवर रोखले. कॅमेरून ग्रीन व सौरभ दुबे यांनी पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या चार फलंदाजांना माघारी पाठवून सामन्यावर पकड घेतली. असे असताना इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील लढतीत KKR च्या ताफ्यात वातावरण तापलेले दिसले. वरुण चक्रवर्थी भर सामन्यात सहकारी अंगकृश रघुवंशीवर संतापलेला दिसला आणि त्यानंतर KKR च्या डग आऊटमध्येही तवाण दिसला.