

What happens if rain washes out KKR vs PBKS?
esakal
KKR vs PBKS Eden Gardens weather update today: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यावर पावसाचं सावट गडद होत चाललं आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर हा सामना होणार आहे, परंतु इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील या सामन्यावर ‘कालबैसाखी’ वादळाचे संकट आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली KKR ला या हंगामात अद्याप यश आलेले नाही, त्यात आज माजी कर्णधार श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, आता तेथील परिस्थितीचा आढावा घेणारे अपडेट्स समोर आले आहेत आणि संपूर्ण मैदान अजूनही झाकले गेले आहे.