

KL Rahul | India vs West Indies 3rd ODI
Sakal
India vs West Indies 3rd ODI: भारतीय संघाला शनिवारी (३ ऑक्टोबर) वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. पण असे असले तरी न्यू चंदिगढला झालेल्या या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शानदार शतक (KL Rahul Century) करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने मोठा विक्रमही केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने रोहित शर्मा (९२ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (५७ धावा) यांच्या विकेट्स गमावल्यानंतर केएल राहुलने जबाबदारी हाती घेत आक्रमक खेळ केला. त्याने ८७ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह १२९ धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे ९ वे वनडे शतक ठरले. त्याच्या शतकामुळे भारताने ५० षटकात ७ बाद ३५१ धावा केल्या.