IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Rohit Sharma World Record as Opener: रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडेत सलामीला खेळताना दमदार खेळ केला. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.
Rohit Sharma | India vs West Indies 3rd ODI

Rohit Sharma | India vs West Indies 3rd ODI

Sakal

Updated on: 

Rohit Sharma Record in India vs West Indies: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना न्यू चंदिगढ येथे सुरू आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून आधीच ही मालिका जिंकली आहे. पण तिसर्‍या सामन्यात भारतीय संघ निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी, तर वेस्ट इंडिज प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने मोठा विश्वविक्रम केला आहे.

Rohit Sharma | India vs West Indies 3rd ODI
Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com