IND vs NZ, 1st Test: केएल राहुलचं धडाकेबाज शतक! SENA देशात 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

KL Rahul Century Records : भारताचा सलामीवीर केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शतक केले आहे. यासह त्याने अनेक मोठे विक्रम केले आहेत.
KL Rahul Century | India vs New Zealand 1st Test

KL Rahul Century | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India, 1st Test: भारताचा सलामीवीर केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कमालीची फलंदाजी करत शतक केले आहे. वेलिंग्टन येथे भारत आणि न्यूझीलंड संघात गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केएल राहुलने त्याचे शतक पूर्ण केले. यासह त्याने खास विक्रमही केले आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सुरुवात दमदार करताना सलामीला १३० धावांची विक्रमी भागीदारीही केली. जैस्वालने ८९ चेंडूत ८५ धावांची आक्रमक खेळी केली.

KL Rahul Century | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test, 3rd Day: केएल राहुल शतकाच्या उंबरठ्यावर, पडिक्कलचेही अर्धशतक; लंचब्रेकपर्यंत काय घडलं?
Loading content, please wait...