KL Rahulला LSG संघात कायम राखणार, पण कॅप्टन्सी नाही देणार; त्याला रिप्लेस करण्यासाठी २ स्टार शर्यतीत

KL Rahul meet Sanjiv Goenka: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आणि मालक संजीव गोएंका यांची काल भेट झाली. या चर्चेत बरीच खतबतं झाल्याचे वृत्त आहे.
KL Rahul LSG
KL Rahul LSG esakal
Updated on

KL Rahul axed LSG captain: लखनौ सुपर जायंट्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये बदलाचे संकेत मिळत आहेत. सोमवारी कर्णधार लोकेश राहुल आणि संघ मालक संजीव गोएंका यांच्यात बैठक पार पडली. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल याला लखनौ सुपर जायंट्स आगामी IPL 2025 साठी संघात कायम ठेवणार आहे, परंतु त्याला कर्णधारपद देणार नसल्याचे स्पष्ट आहे. IANS ने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधाराच्या दबावामुळे लोकेशला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच त्याला या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे.

काही रिपोर्टनुसार LSG त्याला रिटेने ठेवण्याची शक्यता कमी आहे. पण, IANS ने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्यानुसार KL Rahul याला संघ कायम राखेल, परंतु कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील. कृणाल पांड्या आणि निकोलस पूरन ही दोन नावं LSG च्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.

KL Rahul LSG
Jay Shah: भारतात क्रिकेटला मिळणार मोठा बुस्ट, जय शहांची महत्त्वाची घोषणा

''CEO संजीव गोएंका यांच्यासोबत त्याची अधिकृत मिटींग होती. यात या दोघांमध्ये कर्णधारपद व रिटेनशीप यावर चर्चा झाली. दरम्यान, राहुलला फक्त फलंदाज म्हणून संघासाठी योगदान द्यायचे आहे आणि त्यामुळे त्याला कर्णधारपदी कायम राखण्याची शक्यता कमी आहे. गोएंका यांनी लोकेशवर पूर्ण विश्वास दाखवला आहे आणि ते त्याला खेळाडू म्हणून रिटेन करण्यासाठी तयार आहेत. पण, तो कर्णधारपदी दिसणार नाही,''हे फ्रँचायझीच्या एका सूत्राने IANS ला सांगितले.

''आम्ही कर्णधारपदासाठी पर्यायांची चाचपणी करत आहोत, परंतु बीसीसीआयने अद्याप प्लेअर रिटेनशन पॉलिसी जाहीर केलेली नाही. कर्णधारपदासाठी आमच्याकडे निकोलस पूरन व कृणाल पांड्या असे दोन पर्याय आहेत,''असेही सूत्राने सांगितले.

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी ऑक्शन होणार आहे आणि फ्रँचायझींना प्रत्येकी ६ खेळाडू संघात कायम राखण्याची परवानगी BCCI कडून मिळण्याची शक्यता आहे. अशात बरेच मोठे खेळाडू अन्य संघात जातील अशा अफवा सुरू आहेत. लोकेश राहुल इंडिया ए टीमकडून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफीत खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com