KL Rahul: बीसीसीआयने पंतप्रधानांना जर्सी भेट देताच केएल राहुल का आला ट्रेंडिंगवर?

Team India Arrival: टीम इंडिया आज बार्बाडोसमधून टी 20 वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन मायदेशात परतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींची भेट घेतली.
KL Rahul
KL Rahulesakal

KL Rahul Jersey No 1 : टी 20 वर्ल्डकप 2024 जिंकणारी टीम इंडिया वादळामुळं बार्बाडोसमध्येच अडकून पडली होती. आज सकाळी विशेष विमानानं टीम इंडिया मायदेशात परतली. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीम इंडियाची नवी टी 20 जर्सी भेट म्हणून दिली. मात्र यानंतर केएल राहुल चांगलाच चर्चेत आला आहे.

KL Rahul
Team India Arrival Live Updates : वानखेडे स्टेडियमवर चेंगराचेंगरी; चाहत्यांचा अती उत्साहामुळे घडली घटना

बीसीसीआने टीम इंडियाची नवी टी 20 जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली. या जर्सीवर नमो असं नाव लिहिलं होतं. याचबरोबर बीसीसीआयने या जर्सीला क्रमांक देखील दिला होता. हा क्रमांक होता एक! यामुळंच केएल राहुल ट्विटरवर ट्रेंड करत होता. अनेक चाहत्यांनी केएल राहुलला टॅग करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

केएल राहुल हा टीम इंडियाचा एक दर्जेदार खेळाडू असून तो अनेक वर्षापासून टीम इंडियाकडून खेळतोय. मात्र यंदाच्या टी 20 वर्ल्डकप संघात त्याची निवड झाली नव्हती. दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंत आणि आयपीएल गाजवणाऱ्या संजू सॅमसनला निवडसमितीने झुकतं माप दिलं होतं.

आता केएल राहुलने टीममधील स्थानही गमावलं अन् बीसीसीआयने त्याच्याकडून जर्सी क्रमांक देखील काढून घेतला अशी चर्चा आहे.

KL Rahul
Team India: जल्लोष मुंबईत बस मात्र गुजरात पासिंगची!

दरम्यान, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. मुंबईत भारतीय संघाची ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक नरीमन पॉईंट पासून वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये एक छोटा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात टीम इंडियाला बीसीसीआयने घोषित केलेल्या 125 कोटी रूपयांच्या बक्षीस रक्कमेचं वितरण करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com