IND A vs AUS A: तापाने फणफणला, तरी उभा राहिला! KL Rahul च्या नाबाद १७६ धावा अन् सुदर्शनचे शतक; भारताचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय

KL Rahul unbeaten 176 runs against Australia A : भारताच्या अ संघाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात ४१२ धावांचा यशस्वी पाठलाग करून विजय मिळवला. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेपूर्वी भारताचे अनेक फलंदाज चांगले फॉर्मात आले आहेत.
KL Rahul battled fever to play one of his finest knocks, scoring an unbeaten 176 as India A chased down 412 runs against Australia A

KL Rahul battled fever to play one of his finest knocks, scoring an unbeaten 176 as India A chased down 412 runs against Australia A

esakal

Updated on
Summary
  • ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात ४२० धावा केल्या, तर भारत अ केवळ १९४ धावांत गडगडला.

  • दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला १८५ धावांत गुंडाळले.

  • मानव सुतारने एकूण ८ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.

KL Rahul battled fever to play one of his finest knocks: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आम्ही तयार आहोत, हेच केएल राहुल व साई सुदर्शन यांनी दाखवून दिले. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात भारताने चौथ्या डावात ४१२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. लोकेश राहुल ताप आल्याने काल अर्धशतकानंतर मैदानाबाहेर गेला होता आणि त्यामुळे विंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी हा धक्का आहे का, अशी भीती वाटू लागली होती. पण, आज तो मैदानावर उतरला आणि नाबाद १७६ धावांची खेळी करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलाल. त्याच्यासोबतिला साई सुदर्शनने मैदान गाजवले आणि शतक पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com