

Kristian Clarke Joins New Zealand T20 Squad as Injury Cover
Sakal
Kristian Clarke Joins New Zealand T20 Squad: भारत आणि न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२१ जानेवारी) टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी न्यूझीलंडने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मायकल ब्रेसवेलच्या नेतृत्वात खेळलेल्या न्यूझीलंडने (New Zealand Team) नुकतीच भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला. ३७ वर्षात त्यांनी पहिल्यांदाच भारतात वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला.
पण रविवारी (१८ जानेवारी) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार ब्रेसवेल (Michael Bracewell) क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडून ड्रेसिंग रुमकडे परतावे लागले होते. यानंतर आता न्यूझीलंडने अष्टपैलू खेळाडू क्रिस्टन क्लार्क (Kristian Clarke) याला टी२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात संधी देण्यात आली आहे.