IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

India A Take Massive 163-Run First-Innings Lead vs Australia A: पुदुचेरीतील पहिल्या कसोटीत भारत अ संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६३ धावांची भक्कम आघाडी घेतली. मुंबईच्या शम्स मुलानी, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन या त्रिमूर्तीने महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
Shams Mulani and Tanush Kotian | India A vs Australia A

Shams Mulani and Tanush Kotian | India A vs Australia A

Sakal

Updated on

India A vs Australia A, 1st Unofficial Test: ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय अ संघाने वर्चस्व ठेवले आहे.

पुदुचेरी येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (चार दिवसीय सामना) दुसऱ्या दिवस अखेर देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वातील भारताने १६३ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली, त्यातही शम्स मुलानी (Shams Mulani), तुषार देशपांडे (Tushar Deshpande), प्रफुल हिंगे (Praful Hinge) यांनी लक्ष वेधले.

Shams Mulani and Tanush Kotian | India A vs Australia A
IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com