

LALIT MODI IPL 2009 FEMA VERDICT
Sakal
Lalit Modi Marathi News : दक्षिण आफ्रिकेतील न्यायलयीन लढ्यात आपल्याला १६ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच आपण भारत भेटीची योजना आखत आहोत, असे मत आयपीएलचे जनक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बुधवारी सांगितले.
आयपीएल विदेश चलन प्रकरणाची कायदेशीर लढाई ललित मोदी दक्षिण आफ्रिकेत लढत होते. यातून आपल्याला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे, असे एका व्हिडिओद्वारे ललित मोदी यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस आपण भारत भेट देण्याचा विचार करत आहोत, असेही मोदी म्हणाले.