Vaibhav Suryavanshi series winning captain
esakal
Ayush Mhatre appointed India U19 captain: वैभव सूर्यवंशीने कर्णधार म्हणून पदार्पणाची मालिका गाजवली. १४ वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३-० असा दणदणीत विजय मिळवला. एक सलामीवीर फलंदाज म्हणून वैभवने स्वतःची प्रतिभा सिद्ध केलीच आहे आणि कर्णधार म्हणूनही तो चमकला. पण, आफ्रिकेविरुद्धची मालिका संपली अन् भारतीय संघात नेतृत्वबदल पाहायला मिळतोय. भारताचा हा युवा संघ १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायला उतरणार आहे आणि त्या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी नव्हे, तर आयुष म्हात्रे संघाचे नेतृत्व करणार आहे.