IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Why Sun TV Network filed case against Chennai Super Kings: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मैदानाबाहेर मोठा वाद उभा राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाविरोधात Sun TV Network ने मद्रास उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. या कंपनीचे व्यवस्थापन Kavya Maran यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे.
Chennai Super Kings faces a legal challenge before IPL 2026 as Sun TV Network

Chennai Super Kings faces a legal challenge before IPL 2026 as Sun TV Network

esakal

Updated on

Kavya Maran company vs MS Dhoni CSK legal dispute: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ (IPL 2026) चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मैदानाबाहेर एका कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी सन टीव्ही नेटवर्कने (Sun TV Network) CSK विरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत, सीएसकेने संबंधित गाणी वापरणे थांबवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com