
थोडक्यात
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत भारतावर २२ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
शोएब बशीरच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मालिकेबाहेर जावं लागलं आहे.
इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत.
सोमवारी (१४ जुलै) इंग्लंड संघाने लॉर्ड्समध्ये भारतीय संघाला कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात अवघ्या २२ धावांनी पराभूत केले. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात इंग्लंडने अखेर बाजी मारली आणि अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, असं असलं तरी इंग्लंडला चौथ्या सामन्यासाठी संघात बदल करावा लागला आहे.