Rohit Sharma drops a big hint about a possible Netflix project, leaving fans excited.
esakal
Mumbai Indians Netflix project Rohit Sharma story: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वरच्या लेव्हलला पोहोचवली आहे. रोहितने त्याच्या इंस्टा स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यामुळे तो लवकरच नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेटफ्लिक्स आणि मुंबई इंडियन्सचा लोगो असलेले एक पत्र रोहितने स्टोरीत पोस्ट केले आहे आणि त्यात रोहित शर्माचे नाव व जर्सी क्रमांक ४५ दिसत आहे. त्यावर आजची म्हणजेच ९ एप्रिल २०२६, ही तारीखही दिसत आहे. रोहितच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे आणि नेमकं काय समोर येणार आहे, याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.