

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रवेश पक्का केला आहे. मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य सामन्यात ४ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला आणि पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
या सामन्यात भारताची सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यानंतर भारतीय संघानेही जोरदार जल्लोष केला. त्याचसोबतच चाहत्यांनाही आनंद लपवता आला नाही. त्यातच एका चिमुकल्या चाहत्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.