BAN vs AFG 1st Test: बांगलादेश संघातील 'हिंदू' खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड! कसोटीच्या १७७ वर्षांच्या इतिहासात नोंदवला गेला अनोखा विक्रम

BAN vs AFG first Test Litton Das record बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास याने अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम नोंदवला.
Bangladesh vs Afghanistan Test

Litton Das creates world record in Bangladesh vs Afghanistan Test

esakal

Updated on: 

Litton Das creates world record in Bangladesh vs Afghanistan Test: बांगलादेशने अबुधाबी येथे सुरू असलेल्या कसोटीत अफगाणिस्तानविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. बांगलादेशला पाचव्या दिवसाच्या खेळात विजयासाठी ६ विकेट्स हव्या आहेत,तर अफगाणिस्तानला २५८ धावा करायच्या आहेत. त्यामुळे सामन्याच्या निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागेल हे सांगणे अवघड आहे. मात्र, या सामन्यात बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन कुमार दास याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटच्या १७७ वर्षांच्या इतिहासात असा अनोखा विक्रम यापूर्वी झाला नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com