
Lookback 2024 Cricket: भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही घडलं तरी त्याची चर्चा ही होतेच. २०२४ वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सांगायचं झालं, तर यशाचं शिखर दाखवणारं आणि अपयशाची चवही चाखायला लावणारं ठरलं. याशिवाय तीन वेगवेगळ्या विभागातील वर्ल्ड कप स्पर्धाही २०२४ वर्षात रंगल्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची स्पर्धा अधिक रोमांचक झाली. अनेक खेळाडूंनी अन् संघांनी इतिहास घडवला. आता २०२४ वर्ष संपत आलंय तेव्हा मागे वळून पाहाताना या संपूर्ण वर्षभरात क्रिकेटविश्वात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊ...