
India’s Test Cricket Ends 2024 on a Bitter Note: भारतीय क्रिकेट संघाला सोमवारी (३० डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना होता. त्यामुळे २०२४ वर्षातील हा भारताचा शेवटचा होता.
मात्र कसोटीत भारतासाठी २०२४ वर्षाचा शेवट पराभवाने झाला आहे. इतकंच नाही, तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशांनाही धक्का लागला आहे.
भारताची यंदाच्या वर्षातील कसोटीतील कामगिरी तशी चढ-उताराचीच राहिली आहे. भारताला सातत्यपूर्ण कामगिरी वर्षभरात करता आलेली नाही, त्यामुळे भारताला त्याचा फटका बसला आहे.